---Advertisement---

कराडनंतर ‘खोक्या’ला तुरुंगात मारहाण !

By team
On: April 4, 2025 10:18 AM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्हा नेहमीच गुन्हेगारीने चर्चेत असतांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी प्रकरणे उघडकीस आले आहेत. याच काळात बीडमध्ये दहशत माजवणारा सतीश भोसले उर्फ खोक्याचेही अनेक कारणामे समोर आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या तुरुंगात आहे. असं असतानाच आता या खोक्याला वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. या मारहाणीचे फोटो व्हायरल जाल्यानंतर आता

सतीश भोसलेला गुरूवारी वन विभागाने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला वन विभागाच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. या कोठडीमध्ये त्याला मारहाण करण्यात आली असून त्याच्या पाठीवर वळ असलेले फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान या सर्व प्रकारानंतर खोक्याला पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खोक्याला पोलिसांनी अटक केलं असून सध्या तो वन विभागाच्या कोठडीत आहे. वन विभागाच्या कोठडीत खोक्या भोसले याला मारहाण झाल्याचा दावा केला जातोय. खोक्याच्या वकिलाने हा दावा केला आहे. खोक्याला मारहाण झाल्यानंतर वळ उठल्याचे कथित फोटो व्हायरल झाले आहेत.

समोर आलेल्या फोटोंचा आधार घेत वकिलाने सतीश भोसले याला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली. वकिलाची ही मागणी न्यायालयाने मान्य केली असून पुन्हा एकदा खोक्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्याला वन विभागाच्या कोठडीत कोणी मारहाण केली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या राहत्या घरी वन विभागाने केलेल्या कारवाईमध्ये वन्य प्राणी पकडण्यासाठी लागणारे जाळी, वन्य प्राण्यांच्या शिकार करण्यासाठी लागणारे हत्यारे त्याचबरोबर मांस आढळून आले होते. या प्रकरणी वनविभागाने सतीश भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांवरती वन कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खोक्याला गुरूवारी दुपारी वन विभागाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला वन विभागाच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. याच कोठडीत त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे फोटो व्हायरल झाले आहेत, असा दावा खोक्याच्या वकिलाने केला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!