---Advertisement---

पुन्हा महिला डॉक्टरवर टोळक्यांनी चढवला हल्ला

By team
On: August 18, 2024 4:24 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशभारत कोलकातामधील महिला डॉक्टरवर अत्याचार आणि खून प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असतानाच मुंबईतील सायन येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. सायन रुग्णालयातील महिला डॉक्टरवर मद्य प्राशन केलेल्या पाच सहा जणांच्या टोळक्यांनी हल्ला केला. सायन पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास सुरु केला आहे.

सायन रुग्णालयातील महिला डॉक्टरला पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी रुग्णालयातच मारहाण केली. त्या तरुणांनी दारु प्यायलेली होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामध्ये महिला डॉक्टर जखमी झाल्या आहेत. रविवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. महिला डॉक्टर ड्युटीवर असताना हा प्रकार घडलाय.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पाच ते सहा जण पहाटे एका व्यक्तीला घेऊन रुग्णालयात आले, त्या व्यक्तीच्या चेहऱ्याला जखम झालेली होती. त्या रुग्णावर उपचार करण्यात येत होते. त्याचवेळी एका व्यक्तीकडून महिला डॉक्टरला शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. इतक्यावरच थांबले नाही, डॉक्टरवर हल्लाही केला.

या हल्ल्यापासून बचाव करत असतांना महिला डॉक्टर जखमी झाल्या. महिला डॉक्टराकडून सायन पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. पण महिला डॉक्टरावर झालेल्या हल्ल्यामुळे सायन रुग्णालयात संतापाचे वातावरण आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!