---Advertisement---

मविआच्या काळात अजित दादांनी सरकार चालवले ; खा.तटकरे

By team
On: February 4, 2024 10:28 AM
Follow Us:
---Advertisement---

रायगड : वृत्तसंस्था

देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मोठा गोप्य्स्फोट केला आहे. ते सध्या दोन दिवसांच्या रायगड दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

खा.तटकरे म्हणाले कि, महाविकास आघाडीच्या त्या दोन वर्षात सगळे सरकार हे अजितदादांनी चालवले, कोरोना काळात पंतप्रधान आले का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता, मात्र देशात वेगवेगळ्या भागात निसर्गाचे अनेक तडाखे बसत असतात सगळ्याच ठिकाणी पंतप्रधान पोहोचू शकत नाहीत मात्र आता मलाही ठाकरे यांना प्रश्न विचारावा लागेल तुम्ही मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या त्या दोन वर्षांमध्ये अजितदादांनी सरकार चालवले त्यामुळे या सगळ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणांमधून मनोरंजन होत आहे, असा टोलाही त्यांनीलगावला आहे.

सुनील तटकरे म्हणाले की, सहा वेळा लोकसभेवर जाऊन दहा वर्ष केंद्रात मंत्री राहून एखादी योजना अनंत गीतेने सांगावी आणि लाख रुपयाचे बक्षीस मिळवावे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा एकही मुद्दा नाही रायगड मधील मेडिकल कॉलेजचे प्रयत्न कोणी केले या सुनील तटकरे यांनी प्रयत्न केले या जिल्ह्यासाठी अनंत गीते यांचे काय योगदान आहे ? असा सवालही तटकरे यांनी उपस्थित केला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर घराणेशाहीचा आरोप करावा हे हास्यास्पद आहे. उद्धवजींच्या भाषणामध्ये दोन-तीन दिवस अनेक गमतीजमती ऐकायला मिळाल्याची ही खिल्ली तटकरे यांनी उडवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!