---Advertisement---

अक्कलकोट तालुक्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास प्रारंभ

By team
On: September 19, 2025 3:46 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

महिलांचे आरोग्य आणि कुटुंबाचे सशक्तीकरण यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे स्वस्थ नारी,सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथून करण्यात आला. दि. १७ सप्टेंबर रोजी गावचे सरपंच वर्षा भंडारकवठे यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अश्विनी मेडिकल कॉलेजच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. जयंती आडके यांनी भूषवले.

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे, प्रा.आ. केंद्र चपळगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवलिला माळी,डॉ.सारंग पाटील, डॉ. शुभम घंटे, तालुका आरोग्य विस्तार अधिकारी महेश भोरे, आरोग्य सहाय्यक सिद्रामप्पा लोकापूरे,प्रा.आ. केंद्राचे आरोग्य निरीक्षक परमेश्वर बिराजदार,श्रीधर नडीमेटला, आरोग्य सहायिका राजश्री पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नेहा अग्रवाल, औषध निर्माण अधिकारी आदित्य हिरेमठ, आरोग्य सेविका परविन शेख, मंजुळा जाधव प्रज्ञा गायकवाड, नेत्र चिकित्सक नबीलाल नदाफ, आरोग्य कर्मचारी सिद्धेश्वर चटमुटगे,बाबासाहेब सिरसट,बिलाल इनामदार,विजय कोरे,रोहित कांबळे तसेच कार्यक्षेत्रातील आशा व आशा गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील महिला सहभागदेखील उल्लेखनीय होता.

या अभियानांतर्गत दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान तालुक्यातील सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. अश्विनी मेडिकल, कुंभारी येथील तज्ञ डॉक्टरकडून महिलांचे बीपी, शुगर, ओरल कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय गर्भवती महिलांची तपासणी, दंत तपासणी, त्वचारोग तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच बालकांची तपासणी केली जात आहे. लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात आले असून महिलांचे ईसीजी तपासणीही मोफत करण्यात आली.

या आरोग्य शिबिरात तब्बल २०९ महिला व बालकांची तपासणी झाली. गरजूंना योग्य त्या उपचारांसाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्य जागरूकता निर्माण होऊन संपूर्ण कुटुंब अधिक निरोगी व सक्षम होईल, असा विश्वास डॉ.करजखेडे यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!