---Advertisement---

अक्कलकोट तालुका ११८ ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत २२ एप्रिलला

By team
On: April 18, 2025 3:55 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील सन २०२५ – २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी ११८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी दि.२२ एप्रिल रोजी  दुपारी १२ वाजता नवीन तहसील कार्यालय, अक्कलकोट येथे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यात सन २०२५ ते २०३० मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला आणि महिला (अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या प्रवर्गातील स्त्रियांसह) सरपंचांची पदे निश्चित केली जाणार आहेत.महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील नियम ३. (अ) (ब) अन्वये तहसिलाच्या एकूण लोकसंख्येशी, त्या तहसिलदार अशा जातींच्या व जमातींच्या लोकसंख्येचे असलेले प्रमाण लक्षात घेऊन व नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गासाठी राखून ठेवावयाची सरपंचाची पदे त्या तहसिलमध्ये असलेल्या सरपंचाच्या एकूण पदाच्या २७ टक्के प्रमाणे पोटनियम २ अन्वये नेमून दिलेनुसार संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांना सरपंच आरक्षण सोडत काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गाव पातळीवरच्या निवडणुका या अतिशय महत्त्वाच्या असतात. या निवडणुका प्रचंड चुरशीच्या असतात त्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.या सोडत कार्यक्रमासाठी तालुक्यातील इच्छुक सर्व नागरिकांनी हजर रहावे, असे आवाहन तहसिलदार विनायक मगर यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!