---Advertisement---

अंबादास दानवे आमच्यासोबत असतील ; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

By team
On: March 19, 2024 2:38 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही महिन्यापासून अनेक पक्षातील नेते राजीनामा देवून भाजपात पक्ष प्रवेश करीत असतांना अनेक नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत देखील दाखल झाले असतांना आता शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी देखील एक मोठा दावा केला आहे.

आ.बांगर म्हणाले कि, येत्या 8 ते 10 दिवसात अंबादास दानवे हे आमच्यासोबत असतील तसेच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला अशी टीकाही त्यांनी केली आहे. अंबादास दानवे यांच्याबाबत त्यांनी केलेल्या दाव्याने मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ते म्हणाले, ”अंबादास दानवे माझे मित्र आहेत. त्यांच्यावर बोलण्यासारखे फार नाही. येत्या आठ ते दहा दिवसांत ते आमच्यासोबत असतील. आमच्या खांद्याला खांदा लावून ते काम करताना दिसतील. आता अर्थच दिवसांत ते स्फोट घडवून आणतील. तसेच शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली तरी चांगलीच बाब आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीचे नाव आमच्याकडूनच येऊ शकते”, असे बांगर म्हणाले.

पुढे संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ”बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली होती, मात्र, तीच शिवसेना संपवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. काल मी मुंबईत असतांना एक म्हतारी मला भेटली आणि मी शिंदेंच्या शिवसेनेत असल्याचे महित झाल्याने तिने माझी पाठ थोपटली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला. यामुळे अक्षरशः वेदना होतात”, अशा भावना बांगर यांनी व्यक्त केल्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!