ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्या अक्कलकोटमध्ये आंबेडकरी जनतेचा आक्रोश महामोर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोटमध्ये सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी आंबेडकरी जनतेचा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी महामोर्चा निघणार आहे.या मोर्चाचे मोठे नियोजन आणि तयारी करण्यात आली असून विविध मागण्यांसाठी हा महामोर्चा अक्कलकोट येथील भीम नगर येथुन निघणार आहे. या महामोर्चा साठी चलो अक्कलकोटची घोषणा देण्यात आली आहे.

सकाळी १० वाजता अक्कलकोट भिमनगर ते राजे फत्तेसिंह चौक, जूना तहसील कार्यालय, ए-वन चौक मार्गे बस स्टॉप या प्रमुख मार्गावरून या भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चात अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील मागासवर्गीय बांधवांवर मोठ्या प्रमाणात होत असलेला अन्याय अत्याचार, जातीयवाद, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालतो त्यांच्याच पुतळ्याची गुलबर्गा येथे विटंबना करण्यात आली होती . तसेच अक्कलकोट तालुक्यातील मागासवर्गीय जनतेवर मोठया प्रमाणात अन्याय वाढला आहे. या अत्याचारा विरुद्ध व अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याकरीता हा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

हा अन्याय आज त्यांच्यावर झाला उद्या आपल्यावर हि होऊ शकतो,यासाठी समाजातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.तरी सर्वांनी आपापसातील वयक्तीक व राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन परिवारासह
ह्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन ताकद दाखवून द्यावे असे आवाहन भीम सैनिकांनी केले आहे.या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व गावांना गाव भेटी देऊन चर्चा ,बैठका घेऊन मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराबाबत जनजागृती तालुक्यातील नेते मंडळी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!