ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अनिल देशमुखांच्या गाडीवर तुफान दगडफेक.. डोक्यातून रक्तस्त्राव

नागपूर वृत्तसंस्था 

 

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख  गाडीवर सोमवार रात्री  दगडफेक झाली आहे. नरखेड येथील प्रचारसभा आटपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत होते. काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचाराचासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यात कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. या हल्ल्यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. यावेळी त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव देखील झाला.

बेलफाट्यावर आल्यानंतर अनिल देशमुख यांच्या गाडीसमोर एक व्यक्ती आला आणि त्याने एक मोठा दगड देशमुख यांच्या गाडीच्या समोरच्या काचेवर मारला. त्यामध्ये अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. हा हल्ला झाल्यानंतर अनिल देशमुख यांना काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशमुख यांना झालेली जखम खोलवर झाली नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

हल्ला करणारे हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप यावेळी जखमी झालेले अनिल देशमुख यांनी केला आहे. ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून तो चिंतेचा विषय असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. अनिल देशमुखच नव्हे तर राज्यात कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला होऊ नये. एका माजी गृहमंत्र्यावर हल्ला होतोय हे दुर्दैवी असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने काटोलमधून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली, पण अनिल देशमुख यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढत आहेत. सलील देशमुख निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी माघार घेतली आणि त्यांच्या घराण्यातील वाद संपला. काटोल विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सलील देशमुख हे अधिकृत उमेदवार आहेत.

अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या वर 100 कोटीच्या वसुलीचे आरोप झाले, यानंतर अनिल देशमुख तुरुंगात असताना सलील देशमुख यांनी मतदार संघ पिंजून काढला आणि पक्षाची बांधणी केली. कारमधून जात असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनीच माझ्यावर हल्ला केला असेल, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

 

कोण आहेत अनिल देशमुख ?

-अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.

-राष्ट्रवादीत पक्षफूट झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर राहणे पसंत केले.

-अनिल देशमुख यांनी मविआ सरकारच्या काळात गृहमंत्री म्हणून काम केले, याआधी त्यांनी आघाडी सरकारच्या काळात मंत्री म्हणून उत्तम काम केले.

-अगदी शंभर कोटी रुपयांचे आरोप होऊनही तसेच कारवाईची टांगती तलवार असूनही त्यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नाही.

-किंबहुना जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी गृहमंत्रिपदाच्या कार्यकाळातील अनुभवांच्या आधारे पुस्तक लिहून फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!