---Advertisement---

नाशिकच्या नामांकित हॉटेलमधून ५ कोटी जप्त

By team
On: November 18, 2024 5:59 PM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक वृत्तसंस्था 

 

विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यातच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. ही रक्कम पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे यावेळी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून आज सकाळच्या सुमारास या हॉटेलवर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले. सध्या पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची कसून चौकशी सुरु आहे. तसेच इतकी मोठी रक्कम कुठून आणि का आणली? हे पैसे कुणी दिले? कशासाठी दिले? यासारखे अनेक प्रश्न सध्या पोलिसांकडून केले जात आहेत.

 

दरम्यान नाशिकमध्ये आतापर्यंत रोकड, मद्य आणि इतर बाबींचा मिळून तब्बल ७३ कोटी ६० लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी ४४५७ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच नाशिक ९९५.११ लाख रुपये, धुळ्यात १९५३.३२ लाख, जळगाव ८९०.२५ लाख, नंदुरबार – ४१७.९२ आणि अहिल्यानगर-3131.08 रुपये जप्त करणअयात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!