---Advertisement---

गृह विभागाकडून मंजूरी : राज्यात १५ हजार पदांची मेगा भरती जाहीर !

By team
On: August 21, 2025 10:11 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने 12 ऑगस्टच्या बैठकीत 15,631 पदांची पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार गृह विभागाने पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली असून, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलिस शिपाई तसच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.1 जानेवारी 2024 ते दि 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि शासन निर्णय क्रमांकः पोलिस-1125/प्र.क.173/पोल-5अ, दिनांक 20 ऑगस्ट, 2025 दि.01 जानेवारी 2025 ते दि 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी 15631 पदे भरतीकरीता उपलब्ध होणार आहेत.

पदनाम : रिक्त पदांची संख्या

  • पोलिस शिपाई : 12399
  • पोलिस शिपाई चालक : 234
  • बॅण्डस्मन : 25
  • सशस्त्र पोलिस शिपाई : 2393
  • कारागृह शिपाई : 580

एकूण 15631

शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथिलता देऊन पोलिस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबवण्यास तसेच ओएमआर आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात आले आहे.

या भरती प्रकियेसाठीही या पूर्वीच्या पोलिस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.450/- व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.350/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरीता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!