---Advertisement---

…त्यावर अंधभक्त टाळ्या वाजवतात ; ठाकरे गटाची टीका

By team
On: September 11, 2024 9:35 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज ठाकरे गटाने निशाणा साधला आहे. भारत देश महान आहे. हा महान होण्यात मागच्या दहा वर्षांचे काडीमात्र योगदान नाही. मोदींची दहा वर्षे ही देशासाठी वाया गेलेली वर्षे आहेत. त्यामुळे चीन भारतात सहज घुसत आहे व आपण हात चोळत बसलो आहोत, असे देखील म्हटले आहे.

ठाकरे गटाने पुढे म्हटले आहे की, प्रश्न फक्त चीनने आता अरुणाचल प्रदेशात केलेल्या घुसखोरीचा नाही तर देशाच्या स्वाभिमानाचा, राष्ट्रीय अस्मितेचा आहे; पण मोदींना त्याची चिंता नाही. मोदीचे सरकार हे ‘राष्ट्रीय’ अस्मितेचे सरकार नाही. ते दोन–पाच धनाढ्य लाडक्या उद्योगपती मित्रांसाठी चालवले जाणारे सरकार आहे. त्यामुळे चीनची घुसखोरी, कश्मिरी पंडितांच्या प्रश्नांना त्यात स्थान नाही, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

ठाकरे गटाने म्हटलंय की, चीनने बाजूचे नेपाळ गिळले आहे. चीनचे आरमार मालदीवच्या समुद्रात उभेच आहे. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून चीनने त्यालाही आपल्या टाचेखाली आणले आहे. पाकिस्तानने चीनलाच आपला बाप मानले आहे. म्हणजे हिंदुस्थानच्या जवळ जवळ सर्वच शेजाऱ्यांना ताब्यात घेऊन चीनने हिंदुस्थानच्या सीमांवर स्वतःचे चौकी-पहारे बसवले आहेत. एकही शेजारी आपला मित्र नाही व पंतप्रधान मोदी सातासमुद्रापलीकडील राष्ट्रप्रमुखांच्या गळाभेटी घेत आहेत. परराष्ट्र धोरणातला हा ‘लोच्या’ असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही अत्यंत घातक बाब आहे.

ठाकरे गटाने म्हटलंय की, कुठलाही देश आपल्या इंच इंच भूमीच्या संरक्षणासाठी लढत असतो. जगात अशी अनेक उदाहरणे आहेत. परक्या शत्रूचे पायही तो आपल्या भूमीवर लागू देत नाही, पण इथे लडाख-अरुणाचलमध्ये ‘इंचभर’ नाही, तर शेकडो किलोमीटर जमीन चीनने गिळली तरी मोदी व त्यांचे लोक शांत आहेत व मोदी भक्तांच्या फौजाही गप्प आहेत. मोदी हे अपयशी व अकार्यक्षम पंतप्रधान आहेत. अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा याबाबत मोदींचे ज्ञान व आकलन शून्य आहे. जो नेता देशाच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू इच्छित नाही तो नेता जागतिक राजकारणावर उठाबशा काढतो व त्यावर अंधभक्त टाळ्या वाजवत बसतात.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!