---Advertisement---

जरांगे पाटील आज देणार ‘सागर’ बंगल्यावर धडक

By team
On: February 26, 2024 9:10 AM
Follow Us:
---Advertisement---

जालना : वृत्तसंस्था

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मराठ्यांचा प्रभाव संपवायचा आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटी येथे केला.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या विरोधात कट रचला असून, त्यांना माझा बळी हवा आहे, मी रस्त्यात मेलो तरी मला सागर बंगल्यावर न्या, असे म्हणत मराठा समाजबांधवांसमोर बोलत असतानाच जरांगे-पाटील थेट उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील सागर निवासस्थानाकडे रवाना झाले. त्यामुळे अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी एकच गोंधळ उडाला. दरम्यान, मुंबईकडे जात असताना सायंकाळी उशिरा भांबेरी (ता. अंबड) येथील मराठा समजाबांधवांनी जरांगे-पाटील यांचा ताफा थांबवला.

या ठिकाणी त्यांनी पुन्हा समाजबांधवांना संबोधित केले.सगेसोयऱ्यांचा कायदा करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे गत पंधरा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहेत. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांनी रविवारी मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलवली होती

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!