---Advertisement---

बापरे : अक्कलकोटच्या तलाठ्याने घेतली ३ हजारांची लाच !

By team
On: June 12, 2025 4:05 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील शासकीय कार्यालयात गेल्या काही महिन्यापासून लाचखोरीच्या घटना वाढत असताना आता अक्कलकोट मधील तलाठ्याला खरेदी दस्तावरून सात-बारावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती तीन हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधविभागाने रंगेहाथ पकडले.

फिर्यादींनी दोन जूनला दस्तानुसार अक्कलकोट येथील गट क्र 54/4/ब मधील एक हेक्टर जमीन खरेदी केली. या खरेदीवरून सात-बारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी त्यांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) अरुण मारुती शेवाळे (रा. अक्कलकोट, मूळ गाव पुणे शहर) यांच्याकडे रीतसर कागदपत्रे दिली. नोंद उतार्‍यावर घेण्यासाठी शेवाळे यांनी फिर्यादीकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. फिर्यादींनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर शेवाळे यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे, पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, एस. व्ही. कोळी, संतोष नरोटे, गजानन किणगी, चालक राहुल गायकवाड यांनी पार पाडली.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!