---Advertisement---

बापरे : भरधाव शिवशाही बसने अचानक घेतला भीषण पेट !

By team
On: January 19, 2025 3:30 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना सुरु असतांना पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला भीषण आग लागली. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. तातडीने आयआरबी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसने अचानक पेट घेतल्याने वाहतूक ठप्प झाली. आग विझताच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला तळेगाव टोलनाक्याजवळ भीषण आग लागली. पुण्याहून मुंबईला जाताना शावशाही बसने अचानक पेट घेतला. या शिवशाही बसमधून 12 प्रवासी प्रवास करत होते. बस चालकाच्या प्रसंगावधाने १२ जणांचे जीव वाचले. चालकाच्या बसला आग लागल्याचे लक्षात येताच त्याने बस बाजूला घेतली, 12 प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला. बस चालकाच्या प्रसंगावधानाने या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!