बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे सत्र संपता संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे. बीडमध्ये चोरी, घरफोडी, मारामारी, बलात्कार, छेडछाड, लुटमारीसारख्या घटना सुरूच आहेत. यामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहता बीडला बिहार असे संबोधले जात आहेत. त्यातच आता बीड जिल्ह्यात पुन्हा एका व्यक्तीला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील अमानुष मारहाणीचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मारहाणीचा असल्याचे सांगितले जात आहे. यात कुख्यात गुंड सतीश भोसले यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा पाहायला मिळत आहे. सतीश भोसलेने बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील एका गरीब व्यक्तीला मारहाण केल्याचे समोर आले आहे.
या मारहाणीत संबंधित व्यक्तीचे सगळेच दात तुटले असल्याची माहिती समोर येत आहे. या व्यक्तीला मारहाण करणाऱ्याचे नाव सतीश भोसले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे पोलिसांसोबतच संबंध असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील अमानुष मारहाणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक पांढरा शर्ट परिधान केलेला व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीला एक जण बॅटने मारहाण करताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला काही व्यक्ती उभ्या असल्याचे दिसत आहेत. त्यादेखील त्याला मारहाण करताना दिसत आहे. त्या व्यक्तीला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली जात आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.