---Advertisement---

मनसेला मोठा धक्का : वसंत मोरेंचा राजीनामा 

By team
On: March 12, 2024 2:30 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असे म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला आहे. दरम्यान, मध्यरात्रीच वसंत मोरे यांनी भावनिक पोस्ट केली होती. एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही अशी भावनिक पोस्ट वसंत मोरे यांनी मध्यरात्री फेसबुकवर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांनतर आज दुपारी थेट वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील पत्रही त्यांनी पोस्ट केले आहे.

 

पत्रात नेमकं काय लिहिलंय?

प्रति,

मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

विषयः माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.

आपणास सप्रेम जय महाराष्ट्र।

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातल्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्याना ताकद देतो त्या सहकान्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून कोडी करण्याचे ‘तर अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.

धन्यवाद ।

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!