---Advertisement---

पूरग्रस्तांसाठी मोठा हातभार : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २१ लाखांचा धनादेश सुपूर्त

By team
On: October 15, 2025 7:44 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : (प्रतिनिधी)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ रु. २१ लाखांचा निधीचा धनादेश श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सोलापूर येथील कार्यक्रमात सुपूर्त करण्यात आला.

दरम्यान सोलापूरचे जिल्हाधिकारी- कुमार आशीर्वाद यांच्या आवाहनानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे रु. ५० लाखाचे ५ हजार नग आणि अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सदर संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून १ हजार पूरग्रस्त महिलांना साड्या जिल्हा प्रशासनाला सुपूर्त करण्यात आल्या आहेत.

सोलापूर येथील सोलापूर ते मुंबई विमान सेवेच्या शुभारंभाप्रसंगी सदरचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. या प्रसंगी केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री ना. मुरलीधर मोहोळ, पालक मंत्री ना. जयकुमार गोरे, परिवहन मंत्री ना. प्रतापराव सरनाईक, माजी- खासदार- डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, स्टार एअर लाईन्सचे संजय घोडावत, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, भाजपा प्रांतिक सदस्य शहाजीराजे पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर पोलीस आयुक्त राजेश कुमार, सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, अमर पाटील, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, शिवराज स्वामी, अतिश पवार, निखील पाटील, रोहन शिर्के, राहुल इंडे, स्वामिनाथ बाबर, सदानंद महाडिक आदिजनासह पदाधिकारी, कार्यकर्ते, हवाई उड्डाण प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून
अन्नछत्र मंडळाच्या दातृत्वाचे कौतुक –
सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे रु. ५० लाखाचे, ५ हजार नग व न्यासाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पूरग्रस्त महिलांसाठी १ हजार साडी चोळीचे पूरग्रस्ताना वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे या अगोदरच सुपूर्त करण्यात आले, परत ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ रु. २१ लाखांचा निधीचा धनादेश देण्यात आला आहे. या बाबीचा विशेष उल्लेख करीत धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्याच्या चढत्या आलेखाबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या कार्याची कौतुक मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!