---Advertisement---

मोठी बातमी : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला !

By team
On: September 1, 2025 4:43 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे हल्ला झाला आहे. त्यांनी स्वतःच एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या हल्ल्यात नेमक्या कोणत्या प्रकारचे नुकसान झाले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

किरीट सोमय्या आज सकाळी सिल्लोड पोलिस व तहसीलदारांकडे 1100 बोगस जन्म प्रमाणपत्रांच्या फसवणुकीचे पुरावे सादर करण्यासाठी गेले होते. तिथे त्यांच्यावर व त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेची एका ट्विटद्वारे त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयाबाहेर माझ्यावर व माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला मुस्लिम अतिरेक्यांनी केला. पण सीआयएसएफ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना हाकलून लावले. त्यानंतर मी सिल्लोड पोलिस व एसडीओ तहसीलदार यांच्याकडे 1100 बोगस जन्म प्रमाणपत्रांच्या फसवणुकीचे पुरावे सादर केले. महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 2.24 लाख अपात्र, घुसखोर, बेकायदेशीर व्यक्तींविरोधातील माझा लढा सुरूच राहील.

तत्पूर्वी, किरीट सोमय्यांनी अन्य एका ट्विटद्वारे सिल्लोड व संभाजीनगर येथील काही मुस्लिम नेत्यांनी आपल्याला इशारा दिल्याचा दावा केला होता. त्यांनी मुस्लिम नेत्यांचे यासंबंधीचे एक निवेदनही सार्वजनिक केले होते. या निवेदनात नमूद करण्यात आले होते की, माजी खासदार किरीट सोमय्या हे सिल्लोड शहरात येऊन आम्हा भारतीय मुस्लिमांच्या नागरिक्तवासंदर्भात दिशाभूल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. किरीट सोमय्या यांना आवर घाला नसता आंदोलन करण्यात येईल. या निवेदनावर लखन ठाकूर,अख्तर मौलाना,कॉम्रेड सय्यद अनिस,मुखतार सादिक हुसैन,अकरम शेख,शेख शाकेर,फहीम खाँ मुनिर खाँ पठाण,शेख मुंतजिर उर्फ बल्लू ,शेख इमरान (उर्फ गुड्ड),साहेब खान पठाण,सलीम खान दादा,शेख नजीर यांच्या सह्या आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!