ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : अखेर रणजीत कासलेंना पोलिसांनी घेतले ताब्यात !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड प्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले मोठ्या चर्चेत आले होते. आता त्यांना काल रात्री निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले पुणे विमानतळावर दाखल होताच त्याने पुन्हा एकदा गंभीर आरोप केला होता. माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आल्याचा खळबळजनक आरोप कासलेने केला. तसेच विधानसभा निवडणुकीत गप्प बसावे म्हणू दहा लाख रुपये देण्यात आले होते, असे देखील म्हटले होते. त्याच्या नव्या आरोपमुळे एकच खळबळ उडाली होती.

काल रात्री दिल्लीवरुन कासले पुण्यात आल्यानंतर स्वारगेट परिसरातील एका हॅाटेलमध्ये मुक्कामी होता. पुणे पोलिसांना शरण जाऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, बीड पोलिसांनी आज पहाटे त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. सोशल मीडियावर पोलिसांनी कासलेला स्वारगेट परिसरातील एका हॅाटेलमधून ताब्यात घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

रणजीत कासले याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी अॅाफर देण्यात आली होती, असा दावा या व्हिडिओत त्यांनी केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर कासले गायब झाले होते. यानंतर कासले पुणे पोलिसांना शरण जाणार असल्याचे सांगितले होते. ते पुणे विमानतळावर दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलाताना गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!