---Advertisement---

मोठी बातमी : गुगलची सेवा २५ ऑगस्टपासून बंद; Chrome चा सपोर्टही काही डिव्हाइसेससाठी थांबणार !

By team
On: July 26, 2025 6:24 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आपण सर्वजण रोज गूगलचा वापर करतो. युजर्ससाठी गूगल अनेक सेवा पुरवत असतो, मात्र आता कंपनीने आपल्या एका महत्त्वाच्या सेवेला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे.

गुगल २५ ऑगस्ट २०२५ पासून आपली ‘URL Shortener’ सेवा पूर्णपणे बंद करणार आहे. या टूलद्वारे मोठे लिंक छोटे करता येत होते. आता या लिंक ओपन केल्यास ‘404 एरर’ दिसेल, म्हणजे संबंधित पेज अस्तित्वात नसेल.

गुगलने २०१८ मध्येच ही सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे संकेत दिले होते. गेल्या काही वर्षांत या टूलवरील वापर आणि ट्रॅफिक कमी झाल्यामुळे त्याची जागा आता ‘Firebase Dynamic Links (FDL)’ ने घेतली आहे. हे नवीन टूल अँड्रॉइड, आयओएस आणि वेबवर थेट प्रवेश देते. मात्र, लोकेशन शेअरिंगसाठी Google Apps मधील लिंक्स यापुढेही चालू राहतील.

गुगलने Chrome ब्राऊझर संदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट २०२५ पासून Android 8 (Oreo) आणि Android 9 (Pie) या जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर Chrome चे अपडेट्स बंद होतील. त्यामुळे अशा डिव्हाइसेसवर सिक्युरिटी रिस्क वाढू शकते. बँकिंग, ईमेल्स यांसारख्या संवेदनशील वापरासाठी हे धोकादायक ठरू शकते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!