---Advertisement---

मोठी बातमी : हगवणे हुंडाबळी प्रकरणातील निलेश चव्हाणला पोलिसांनी घेतले ताब्यात !

By team
On: May 30, 2025 4:37 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात प्रमुख आरोपींमध्ये समावेश असल्याचा आरोप केला जाणारा नीलेश चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. नीलेश गेल्या काही दिवसांपासून फरार होता. मात्र आता त्याला नेपाळमधून पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश चव्हाण याच्यावर बाळाची हेळसांड केल्याचा तसेच कस्पटे कुटुंबावर बंदूक रोखण्याचा देखील आरोप आहे. नीलेश चव्हाण याच्या अटकेनंतर आता या प्रकरणात अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित प्रकरणात पीडित कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्या प्रकरणी नीलेश चव्हाण या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणावर वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप आहे. तसेच त्याने त्याच्या पत्नीचा अमानुष छळ व तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. त्याला आता नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. त्याला आज रात्रीपर्यंत पुण्यात आणले जाणार आहे.

नीलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेचे पती शशांक हगवणे आणि बहिण करिष्मा हगवणे यांचा मित्र आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर त्याच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा ठपका आहे. तो स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित करायचा. या प्रकरणी त्याच्यावर 2019 मध्ये पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच ठाण्यात नीलेश चव्हाणवर वैष्णवी हगवणेचे बाळ मागण्यासाठी गेलेल्या तिच्या माहेरच्यांना पिस्तुल दाखवून धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, नीलेश चव्हाणचे लग्न 3 जून 2018 रोजी झाले. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये त्याच्या पत्नीला आपल्या बेडरूममधील सीलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद वस्तू अडकवण्यात आल्याचा संशय आला. तिने याविषयी नीलेशला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पुढच्या फेब्रुवारी महिन्यात त्याच्या पत्नीला घरातील एसीलाही काहीतरी संशयास्पद वस्तू अडकवण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. यावेळी तिचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर तिने आपल्या पतीला म्हणजे नीलेश चव्हाणला त्याचा जाब विचारला.

त्यावर नीलेशने पुन्हा उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर त्याच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप उघडून पाहिला असता त्यात त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याने रेकॉर्ड केल्याचे तिला आढळले. एवढेच नव्हे तर नीलेशचे इतर मुलींसोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओही तिच्या निदर्शनास आले. तिने या प्रकरणी नीलेशकडे विचारणा केली असता त्याने घरातील चाकू दाखवून तिला धमकावले. तिचा गळा दाबला. एवढेच नाही तर तिच्याशी बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!