---Advertisement---

रेशनकार्ड धारकांना मोठा दिलासा : पंतप्रधान मोदींनी घेतला महत्वाचा निर्णय

By team
On: June 13, 2024 10:41 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आता रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे. जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल आणि आपण सरकारकडून मिळणाऱ्या मोफत अथवा स्वस्त रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. सरकारने आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख आणखी पुढे ढकलली आहे. यावेळी सरकारने तीन महिन्यांनी मुदत वाढवली आहे. यापूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून होती. ती आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केली आहे.

सरकारने ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ची घोषणा केल्यापासून रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. एकापेक्षा अधिक रेशनकार्ड असलेले लोक वेगवेगळ्या ठिकाणांवरून मोफत रेशनचा लाभ घेत असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे. याला आळा घालण्यासाठी रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय, अनेक लोक मृत व्यक्तींच्या रेशन कार्डवरही लाभ घेत आहेत. यामुळे गरजू लोकांचे नुकसान होते. असे, सर्व प्रकार थांबवण्यासाठी सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.

आधार आणि रेशन कार्ड लिंक करून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महत्वाचे म्हणजे, रेशन कार्ड आधारला लिंक करण्याच्या अंतिम तारखेला सरकारने यापूर्वीही अनेक वेळा मुदत वाड दिली आहे. आता पुन्हा एकदा हिला मुदतवाढ देत 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. आधार आणि रेशन कार्ड लिंक झाल्यानंतर, गरजूंपर्यंत त्यांच्या वाट्याचे खाद्यान्न पोहोचणे सोपे होईल. ते सुरळितपणे पोहोचू शकेल.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!