ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोन्याच्या दरात मोठी वाढ

जळगाव : वृत्तसंस्था

सोने भावाने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठत बुधवारी (२२ जानेवारी) ते ८० हजार ६०० रुपयांवर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच घेतलेल्या निर्णयाचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.

ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारताच केलेल्या घोषणांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मात्र सुवर्ण बाजारात या निर्णयामुळे सोने भावात वाढ झाली आहे. अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्व सुरू होण्याचे संकेत मिळू लागल्यापासून सोने चांगलेच वधारू लागले होते. गेल्या आठवड्यात १६ व १७ जानेवारी या दोन दिवसांत सोने भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सोने ७९ हजारांच्या पुढे गेले. त्यानंतर ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम करणारे काही निर्णय घेतल्याने सुवर्ण बाजारात तेजी सुरू झाली आहे. मंगळवारी (२१ जानेवारी) सोने ७९ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आणि बुधवारी पुन्हा ७०० रुपयांची वाढ झाली व सोने थेट ८० हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. यापूर्वी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सोने ८० हजारांवर गेले होते. त्यानंतर भाव कमी होत जाऊन ते ८० हजारांच्या आतच होते. आता या भाववाढीने सोने नव्या उच्चांकावर पोहोचले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!