---Advertisement---

ठाकरेंना मोठा धक्का : आमदाराने दिली शिंदेंना साथ !

By team
On: March 1, 2025 10:56 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत असतांना आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असून, ठाकरे गटातील आणि इतर नेते पक्षात दाखल होते आहेत. आता जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणेंची शिवसेना शिंदे पक्षात घरवापसी झाली आहे. जुन्नरमध्ये जाहीर सभा घेत सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. सोनवणे यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

तसेच ठाकरे गटातील अनेकांनी शिंदेंना साथ देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे बळ वाढले आहे. या पक्ष प्रवेशासाठी जुन्नरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार शरद सोनवणे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली असल्याचे सांगितले जात आहे. शरद सोनवणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी शरद सोनवणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून तिकीट मिळावे यासाठी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी प्रयत्न केले, पण त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यानंतर नाराज झालेल्या आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत लोकसभा लढवली. पण ते पराभूत झाले. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडून आले. त्यामुळे ही पोकळी भरुन काढण्यासाठी शिरुर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी शरद सोनवणे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!