ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बिर्जे यांनी ठाकरेंची साथ सोडली : ठाकरे गटाच्या उपनेत्या शिंदेंच्या सेनेत दाखल

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तशी तशी महाविकास आघाडीला एकामागे एक धक्के बसू लागले आहे. नुकतेच ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या काळापासून ठाकरेंसोबत असलेल्या अनिता बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात 10 ऑगस्ट रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विशेष म्हणजे ठाकरे गटाचा मेळावा ठाण्यात सुरू असतानाच बिर्जे यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटातून बाहेर पाडण्यामागचे कारणही सांगितले आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश केल्यानंतर अनिता बिर्जे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ”राजकारणासाठी नाही तर समाज सेवेसाठी मी हा प्रवेश करत आहे. ते लोकही माझेच आहेत. मात्र माझा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझा या भावाचा उपयोग तळागाळातील सर्व महिलांना झाला पाहिजे, असे अनिता बिर्जेंनी सांगितले.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर देखील अनिता बिर्जे या उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत्या. मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यामुळे हा ठाण्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. अनिता बिर्जे या ठाकरे गटाच्या ठाणे महिला आघाडी प्रमुख होत्या. मात्र, आता त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असून वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!