---Advertisement---

जयहिंद शुगर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन

By team
On: August 11, 2024 1:55 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

आचेगांव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर प्रा.लि. कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२४-२५ च्या पुर्वतयारी अंतर्गत मिल रोलरचे पूजन कारखान्याचे प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

आगामी गळीत हंगामामध्ये जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन माने देशमुख यांनी यावेळी केले. यावेळी आचेगावचे माजी सरपंच रमेश क्षीरसागर,कारखान्याचे व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी आर.पी.देशमुख,केन मॅनेजर राजेंद्र जेऊरे, मुख्य शेतकी अधिकारी राहुल घोगरे व विक्रम पाटील,ऊस विकास अधिकारी दत्तात्रय तोरणे, को जन मॅनेजर के.लक्ष्मणन,डिस्टीलरी मॅनेजर श्रीकांत झोरी,प्रोजेक्ट को ऑर्डिनेटर अमोल जगताप,चिफ अकाउंटट दामोदर शितोळे,गोडाऊन मॅनेजर अविनाश पाटील, प्रगतशील शेतकरी सचिन गुंड,बसवराज नागणसूरे,नौशाद शेतसंधी,शिवशरण कोटे,तसेच कारखान्यातील इतर खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!