ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर भाजपाला यश

बूथ प्रमुख व शक्ति केंद्रप्रमुखांची अक्कलकोट येथे बैठक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि संघटनात्मक ताकदीमुळेच भाजपला तालुक्यात घवघवीत यश मिळाले आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्यावतीने बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अमर साबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार
पडली.त्यावेळी ते बोलत होते.बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच बूथ स्तरावर कार्यकर्त्यांची सक्रियता वाढवण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच प्राथमिक सदस्य नोंदणीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल आणि यशाबद्दल साबळे यांनी तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी झोकुन देऊन काम करावे. त्यातही आपल्याला चांगले यश मिळेल असा विश्वास साबळे यांनी व्यक्त केला.यावेळी शशिकांत चव्हाण,परमेश्वर यादवाड, प्रभाकर मजगे, विवेकानंद उंबरजे, अण्णप्पा बाराचारे,राम होनराव, यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे,दयानंद बिडवे,नन्नू कोरबू,विलास गव्हाणे,सातलिंगप्पा परमशेट्टी,महेश जानकर, अमर पाटील,
राजेंद्र बंदीछोडे, जयशंकर पाटील,अरविंद ममनाबाद,आप्पासाहेब पाटील,सुरेश गड्डी, बाबूशा कोरपे,मलकण्णा कोगनूर, महादेव पाटील, केदार विभुते, सुनील कळके,प्रदीप जगताप, अप्पू कवटगीमठ, प्रदीप पाटील,विजया गवंडी, शिवलीला पाटील,जयश्री बटगेरी, निर्मला गायकवाड, लक्ष्मीबाई पोमाजी,ज्योती उण्णद आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!