---Advertisement---

दोन्ही पवार एकत्र येणार ? शरद पवार यांनी फेटाळले

By team
On: January 24, 2025 10:13 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात कालपासून शरद पवार व अजित पवार एकत्र येणार याची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच आता शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे.

शरद पवार म्हणाले कि, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याची उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. तर या संदर्भात सामंजस्याने प्रश्न सुटावा असे आमच्या नेत्यांचे मत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याचे संकेत शरद पवार यांनी यांदी दिले आहेत. इतकेच नाही तर अजित पवार यांच्याशी केवळ एका प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली आहे. आमच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून दोन्ही पवार एकत्र येणार असल्याची शक्यता शरद पवार यांनी फेटाळली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यात शरद पवार आणि अजित पवार यांची काल बंद दाराआड चर्चा झाल्याने याबाबत तर्क लावले जात होते. मात्र ही शक्यताच शरद पवार यांनी फेटाळून लावली. अजित पवार यांच्यासोबत आमची केवळ एका प्रकल्पावर चर्चा झाली असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार आणि मी अनेक संस्थांवर एकत्र काम करत आहोत. त्यामुळे आमच्यात त्या संदर्भात चर्चा झाली असल्याचे देखील ते म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा उद्धव ठाकरे यांचे मत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याबाबतही त्यांनी भाष्य केले. दोन्ही मेळाव्यांची तुलना केली तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला जास्त उपस्थिती होती. असे दिसत असल्याचे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!