---Advertisement---

सर्पदंशाने कुरनूर येथे म्हैस मृत्यूमुखी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२७ : तालुक्यातील कुरनूर येथे सर्पदंशाने म्हैस मृत्युमुखी पडण्याची घटना गुरुवारी घडली आहे.गेल्या चार दिवसांपासून या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. धरण परिसर असल्याने सर्वत्र दलदल निर्माण झालेली आहे अशा स्थितीमध्ये कुरनूर येथील शेतकरी भीम राम मोरे उर्फ पिंटू मोरे यांच्या शेतामध्ये चाऱ्यासाठी म्हणून म्हैस बांधण्यात आलेली होती. या म्हशीला सर्पदंश झाल्याने ती जागेवर मृत्यूमुखी पडली.

पंढरपुरी गवळार म्हैस असून तिची किंमत साधारण ८५ हजाराच्या आसपास होती. परंतु दुपारच्या सुमारास सर्पदंशने मरण पावली. घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी एस.एस कराळे, वैद्यकीय सहाय्यक मनोज वडगावे ,लहू चव्हाण प्रसाद मोरे, रफिक तांबोळी, भीमाशंकर कलकुटगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!