---Advertisement---

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बस उलटली : १८ प्रवाशी जखमी !

By team
On: June 5, 2025 3:17 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुणे-सोलापूर महामार्गावरील मौजे आढेगाव शिवारात साई गणेश ट्रॅव्हल्सची खासगी बस (एमएच.४८-के-१९८१) उलटली. या अपघातात ३ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १७ ते १८ प्रवाशी किरकोळ जखमी झाले. ही घटना आज (दि.५) पहाटे ३.५१ च्या सुमारास घडली. अहमदपूर (लातूर) येथून पुणे येथे ही बस जात होती. अपघात होताच चालक पसार झाला.

चालकास डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पुरुषोत्तम धापटे, हायवे पेट्रोलिंग पोलीस अंमलदार पवार, इंगोले, अपघात पथकाचे सरडे, पोलीस मित्र कदम आदींनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सूचना दिल्या. गंभीर ३ व इतर सर्व जखमींना टेंभुर्णीतील खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!