विमान अपघातापूर्वी अजित पवारांचा शेवटचा फोन; अखेरचा फोन श्रीजीत पवारांना; ऑडिओ क्लिप समोर

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात असतानाच, अपघातापूर्वी अजित पवार यांनी केलेल्या शेवटच्या फोन संभाषणाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी विमानातून शेवटचा फोन … Read more

सीमावादावरून संसदेत गोंधळ; राहुल गांधी आक्रमक, रिजिजूंचा आक्षेप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सीमावादाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लडाखमधील चीनच्या कथित घुसखोरीचा आणि भारतीय सैनिकांच्या बलिदानाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. परिणामी, लोकसभेचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगित करावे लागले. मंगळवारी सभागृहाची कार्यवाही सुरू … Read more

‘कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे’ : अजित पवारांच्या अपघातावर भुजबळांचे विधान

नाशिक : वृत्तसंस्था  सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. “अजित पवार यांचे सरळ चाललेले विमान अचानक पलटी झाले. या प्रकरणात निश्चितच कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे,” असे खळबळजनक विधान भुजबळ … Read more

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये मंगळवारी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना वैमानिकाच्या सतर्कतेमुळे हा बिघाड वेळेत लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. सध्या पंकजा मुंडे मराठवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असून आज लातूर जिल्ह्यात त्यांच्या विविध … Read more

उद्या भूकंप झाला तरी राऊत ऑपरेशन लोटस म्हणतील : भाजप नेत्याचा टोला !

मुंबई : वृत्तसंस्था उद्या भूकंप, त्सुनामी किंवा पूर आला तरी संजय राऊत त्याला ‘ऑपरेशन लोटस’चा भाग असल्याचे म्हणतील, असा खोचक टोला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी लगावला. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर पुन्हा संशय व्यक्त केल्यानंतर नवनाथ बन यांनी हे प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी अजित पवारांचा … Read more

विकासासाठी भाजपचा विजय आवश्यक : आ.कल्याणशेट्टी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी वागदरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचा विजय आवश्यक असून गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात भाजपच्या विजयाची परंपरा कायम आहे. ती परंपरा यावेळीही अबाधित ठेवण्यासाठी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी वागदरी जिल्हा परिषद … Read more

“मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही” : प्रफुल्ल पटेलांचा स्पष्ट शब्दांत खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. “अजित पवारांच्या निधनानंतर कोण, काय, कसे आणि कुठे—या सर्व प्रक्रिया नीट पार पाडण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही, हे स्पष्ट आहे,” असे त्यांनी … Read more

‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’ नामकरणाची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्य सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’ असे नामकरण करून त्यांच्या स्मृती जपाव्यात, अशी विनंती त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ … Read more

तांड्यांच्या विकासाला चालना; स्वतंत्र ग्रामपंचायतीचा निर्णय ; महसूलमंत्र्यांची घोषणा !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था  राज्यातील उपेक्षित आणि मुख्य गावांपासून दूर असलेल्या सर्व तांड्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या निर्णयामुळे तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचे अस्तित्व मिळून १५व्या वित्त आयोगाचा निधी थेट उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धाराशिव जिल्ह्यातील ईट, येणेगूर, आपसिंगा आणि ढोकी येथील प्रचारसभांमध्ये ते … Read more

महापौरपदावर ‘लाडक्या बहिणी’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा धाडसी निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था  ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता महापौर निवडीचे राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेनेचे पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. ठाणे, कल्याण–डोंबिवली आणि उल्हासनगर या तिन्ही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महापौरपदाची धुरा महिलांच्या हाती देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही ठिकाणी महापौरपदासाठी महिला आरक्षण नसतानाही शिंदे … Read more