‘लाडकी बहीण’ योजनेत पुरुषांची घुसखोरी; ७१० अर्ज बाद, प्रशासन सतर्क

मुंबई : वृत्तसंस्था  राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय व महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या नंदुरबार जिल्ह्यातील एका धक्कादायक प्रकारामुळे चर्चेत आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ चक्क काही पुरुषांनी लाटण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील तब्बल ७१० पुरुषांनी या महिलांसाठीच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्याचे … Read more

अजित पवार विमान दुर्घटना तपास निर्णायक टप्प्यात; ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरी सुरू

मुंबई : प्रतिनिधी अजित पवार यांच्या अपघाती विमान दुर्घटनेनंतर तपास यंत्रणांनी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश केला आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जाणारा ब्लॅक बॉक्स अखेर तांत्रिक तपासासाठी सक्रिय करण्यात आला असून, त्यातील माहिती रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे अपघाताच्या नेमक्या कारणांबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता वाढली आहे. विमान … Read more

‘विमानातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता’;अमोल मिटकरींचा पुन्हा संशय !

मुंबई : वृत्तसंस्था सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी पुन्हा एकदा गंभीर संशय व्यक्त केला आहे. विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले, तसेच त्यांना वाचवण्यासाठी जात असतानाच मोठा स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. तसेच या अपघातात प्रथम … Read more

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवारांची पहिलीच भेट; राजकीय वर्तुळाचे लक्ष

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील सहयोग सोसायटीत जाऊन शरद पवार सुनेत्रा पवारांची भेट घेणार असून, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही दोघांची पहिलीच भेट ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच या भेटीकडे … Read more

मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एक कथित कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये थेट जीवे मारण्याची भाषा वापरण्यात आल्याचे ऐकू येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर आंदोलन पेटवले होते. … Read more

सावधान : बालमजुरीला कायमची चाप; कसूरदार मालकांवर फौजदारी कारवाई !

मुंबई : वृत्तसंस्था बालमजुरी ही अनिष्ट प्रथा कायमस्वरुपी दूर करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली असून, बालमजुरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून आवश्यकतेनुसार त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय बालकामगार कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीची सविस्तर कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार स्तरावर बालमजुरी निर्मूलनासंदर्भात … Read more

“विलीनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते; मग बोलण्याचा अधिकार कुठून?” : शरद पवारांचा पलटवार

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती, त्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस सहभागी नव्हते. मग त्या विषयावर बोलण्याचा त्यांना काय अधिकार, … Read more

लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : वृत्तसंस्था  लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. लवकरच लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्यात येणार आहेत, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ज्या उमेदवाराच्या मागे महिला उभ्या राहतात, त्याचाच नंबर पहिला लागतो, असे सांगत त्यांनी महिलांना मतदानाचे आवाहन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. … Read more

मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली मध्येच अडकली; भाविकांची धावपळ

मुंबई : वृत्तसंस्था  कल्याण येथील मलंगगडावर जाणारी फ्युनिक्युलर ट्रॉली क्षमतेपेक्षा जास्त भाविकांना घेऊन जात असताना मध्येच अडकल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ट्रॉलीतून प्रवास करणारे भाविक वाटेतच अडकल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलंगगडावर … Read more

अनावश्यक खरेदीला ‘ब्रेक’; अर्थ खाते घेताच मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णायक आदेश

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील विविध सरकारी विभागांकडून होणाऱ्या अनावश्यक व मनमानी खरेदीवर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलली आहेत. अर्थखात्याची सूत्रे स्वतःकडे घेतल्यानंतर त्यांनी नव्या निविदा काढण्यावर तसेच खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर तातडीची बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. वित्त विभागामार्फत सर्व प्रशासकीय यंत्रणांना कळवण्यात आले आहे की, १५ फेब्रुवारीपासून कोणत्याही प्रकारच्या … Read more