फुट नव्हे, एकता हीच भारतीय संस्कृतीची ओळख ; मोहन भागवत यांचे विधान !

नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या राष्ट्रभावना आणि सांस्कृतिक परंपरेवर भाष्य करताना सांगितले की, “भांडणात पडणे हा भारताचा स्वभाव नाही. आपल्या परंपरेने नेहमीच बंधुत्व, सद्भाव आणि सामूहिक सलोखा यावर भर दिला आहे.” ते नागपूरमधील नॅशनल बुक फेस्टिव्हलमध्ये बोलत होते. भागवत म्हणाले की, भारताची राष्ट्रवादाबद्दलची कल्पना पाश्चात्त्य व्याख्येपेक्षा पूर्णपणे … Read more

वाहनधारकांसाठी मोठी बातमी : एचएसआरपी ‎‎प्लेटसाठी उद्या शेवटची मुदत !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ ‎‎(एचएसआरपी) बसवण्यासाठी आतापर्यंत ८ लाख ‎‎वाहनांपैकी ३ लाख ५४ हजार ७०१ वाहनधारकांनी ‎‎प्लेटसाठी ऑनलाइन बुकिंग केली आहे. त्यातील २‎लाख ९८ हजार ६४१ वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवली ‎‎आहे. बुकिंग केलेल्यापैकी ५६ हजार वाहनधारकांना‎प्लेट बसवण्याचे काम सुरू आहे. नंबर … Read more

मुख्यमंत्री फडणवीस आरोपींना वाचवत आहेत? मुंडेंना अटक करा : मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या खटल्यात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून अटक केली नाही, तोपर्यंत चार्जफ्रेमही होणार नाही, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

राज्य सरकारचा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव ; राज ठाकरेंचा कडाडून विरोध !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळावा होण्यापूर्वी मोठा वाद सुरु झाला आहे. या सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून जय्यत तयारी केली जात आहे. मात्र, सरकारने असा एक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे नाशिककर आणि पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1800 झाडांची … Read more

.. पण आता दुश्मनी झाली तरी चालेल- सयाजी शिंदे आक्रमक !

नाशिक : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून मनपा प्रशासन व पर्यावरण प्रेमी यांच्यामध्ये नाशिक शहरात मोठा वाद सुरू असून आता तपाेवनात साधूग्रामसाठी 1800 वृक्षताेडीची तयारी महापालिकेने केल्याने पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमींनी आंदाेलन उभे केले आहे. यावर मात्र शुक्रवारी (दि. 28) महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी येथील एकही झाड ताेडले जाणार नसून केवळ 5 ते 7 वर्षांत वाढलेली झुडपे … Read more

संतोष देशमुख हत्याकांडाला एक वर्ष ; ‘आरोपींना फाशीच हवी’: कुटुंबीयांचा न्यायाच्या लढ्याचा निर्धार कायम !

बीड : वृत्तसंस्था संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्याकांडाला आज (२९ नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण झाले असले तरी देशमुख कुटुंबीयांचा न्यायासाठीचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. “आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय शांतता आणि समाधान मिळणार नाही,” अशी ठाम भूमिका कुटुंबीय व मस्साजोग ग्रामस्थांनी व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गावात कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. … Read more

सोलापुरात परिवहनमंत्री संतापले अन थेट वरिष्ठ आगारप्रमुखांचे निलंबन !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आठवड्यापूर्वी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देऊन तेथील गैरव्यवस्थापनाबद्दल विभाग नियंत्रक आणि आगार प्रमुखांना चांगलेच खडसावले होते. आता त्यावर कारवाई करण्यात आली आहे. सोलापूरच्या बसस्थानकावर सर्वत्र मुतारीची दुर्गंधी, घाणेरडे फलाट, पाणपोयीचीही तीच अवस्था, थुंकून सर्वत्र झालेली घाण अशा अत्यंत वाईट अवस्थेमुळे संतापलेल्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक … Read more

तोपर्यंत ‘लाडकी बहिण’ योजना बंद होणार नाही, ; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान !

हिंगणघाट : वृत्तसंस्था राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असून यात सत्ताधारी व विरोधक आपले व्हिजन मांडत असताना दिसून येत आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता लाडकी बहिण योजनेवर मोठे भाष्य केले आहे. “देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ‘लाडकी बहिण’ योजना बंद होणार नाही,” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाटच्या प्रचार सभेत दिले. अलीकडील … Read more

राज्यात भाजपची बनवाबनवी उघडी पडली : विजय वडेट्टीवार !

नागपूर : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न देता निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायम अनिश्चित राहिला आहे. त्यामुळे न्यायालयाचा आजचा आदेश हा ओबीसी समाजाला दिलासा देणारा नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नये, असे … Read more

मोठी बातमी : महाराष्ट्र प्रशासनात मोठा बदल ; नवे मुख्य सचिव राजेश अग्रवाल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता महाराष्ट्राच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल होत असून वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांची राज्याच्या नव्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली जात आहे. राज्य शासनाच्या मागणीनंतर केंद्राने त्यांची केंद्रातील जबाबदारीतून मुक्तता केली असून ते आता महाराष्ट्र प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार … Read more