एका ” भारदस्त” अभिनेत्याला मुकलो :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  मुंबई दि 6: रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने “भारदस्तपणा” मिळवून देणाऱ्या जेष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला आहे. दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो नाहीतर महाभारतातील धृतराष्ट्र, रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या … Read more

राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे महापरिनिर्वाणदिनी अभिवादन

  मुंबई दि 6 : दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सागराशी स्पर्धा करणारा भीमसागर येथे येतो . परंतु कोरोनामुळे वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे अभिवादन करताना केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, … Read more

शिरोमणी अकाली दल नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले

  मुंबई,दि ६ : शिरोमणी अकाली दल नेते खासदार प्रेम सिंग चंदूमाजरा यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा येथे भेट घेऊन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा केली. केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असून त्या अनुषंगाने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली शेतकरी आपल्या देशाचा कणा असून त्यांच्या अडचणी व समस्यांचा … Read more

पुण्यात नाट्यगृहे उघडण्यास परवानगी, प्रेक्षकांनी केले स्वागत

पुणे,दि.६ : लॉकडाउन नंतर सरकारने काही बंधने घालून सिनेमा गृह आणि नाट्यगृह उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर सिनेमागृह काही प्रमाणात उघडली परंतु प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता त्यानंतर महाराष्ट्रातील नाट्यगृह उघडण्यास सुरुवात झाली नाट्यनिर्माते संघ यांच्यावतीने निर्णय घेऊन नाटकाचे प्रयोग सुरू करण्यात येत आहेत. त्यात नाटकाचे पहिले तीन प्रयोग पुणे येथील यशवंतराव नाट्यगृह, … Read more

आळंदीसह आसपासच्या गावांत उद्यापासून संचारबंदी

आळंदी : आषाढी, कार्तिकी वारीनंतर आता तिर्थक्षेत्र आंळदी येथे दरवर्षी होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यावर कोरोनाचं सावट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीसह आसपासच्या अकरा गावांत उद्यापासून दि. ६ ते १५ डिसेंबरपर्यंत संचारबंदीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंश देशमुख यांनी दिला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी (८ डिसेंबर) … Read more

डिस्चार्ज मिळताच संजय राऊतांनी लगावला भाजपवर टोला, म्हणाले…

मुंबई – अँजिओप्लास्टीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळताच त्यांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावरून भाजपवर निशाना साधला आहे.  पराभवाबद्दल शिवसेना आत्मचिंतन करेल. हा काही दोष नाही तो गुण आहे. आत्मचिंतनाची वेळ ही बालेकिल्ले गमवणाऱ्यांवर आली आहे. चिंतन आणि आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त आहे. आम्ही कृती आणि … Read more

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम ठरेल :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अमरावती  : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील या प्रकारचा सर्वोत्तम महामार्ग ठरेल. या महामार्गाची कामे गतीने होत असून, येत्या सहा महिन्यात शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.   मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज अमरावती जिल्हयातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजिक समृद्धी महामार्गाची पाहणी  केली, त्यावेळी ते … Read more

मराठा आरक्षण: ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर

मुंबई : एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापिठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे.   चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समन्वय समितीमध्ये अॅड. आशिष गायकवाड, अॅड.  राजेश टेकाळे, अॅड. रमेश दुबे पाटील, अॅड. … Read more

अजितदादा…कुठेतरी लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिली आहे का? निलेश राणेंचा टोला

मुंबई – राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे.  यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत भाजपवर निशाना साधला होता. वाचाळविरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे. आता … Read more

…हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर ; काँग्रेसच्या मंत्र्याचा थेट इशारा

मुंबई । राज्यातील विधान परिषदेच्या निकालांमुळं महाविकास आघाडी अधिक घट्ट झाली असं वाटत असतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेसची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा होती. पण आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती … Read more