अक्कलकोट तालुक्यात कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सवाला प्रारंभ

अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात साधेपणाने गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरात ४१ तर ग्रामीण भागात ६७ असे १०८ ठिकाणी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली असून २० गावात एक गाव एक गणपती याप्रमाणे मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. तर दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ७४ गावामध्ये १४२ गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेश … Read more

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई, दि. 8 : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने 29 जून 2021 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा … Read more

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 3 : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरणावर शासनाचा भर असून  प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार … Read more

अंनिसच्या जटानिर्मुलन मोहिमेस प्रतिसाद विडी घरकुल मध्ये महिला जटामुक्त

सोलापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शाखेने महिलांच्या जटानिर्मुलनासाठी एक मोहिम सुरु केली त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून वस्ती पातळीवरील कार्यकर्ते आता यासाठी उत्स्फूर्त पणे पुढाकार घेत आहेत. गेल्या वीस दिवसात अशी चौथी केस यशस्वी झाली. हैद्राबाद रोड, विडी घरकुल येथील सौ. तारामती महादेव कलशेट्टी वय 66 यांनी गेल्या 35 वर्षांपासून जटा वाढविल्या होत्या, पण … Read more

योगगुरू व आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन

पुणेः योगगुरू व आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन झाले आहे ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. बालाजी तांबे यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनील, संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. बालाजी … Read more

मोहरमसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई, दि. 09 : मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे वाझ/मजलीस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून, मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक … Read more

संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन

  सोलापूर, दि.८ : संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ नरेंद्र कुंटे सर यांचे आज सकाळी दहा वाजता सोलापूर येथे निधन झाले.दयानंद महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते.पू गुरुदेव रानडे परिवारातील ते ज्ञानवंत साधक होते.दैनिक संचार,दैनिक समाचार मध्ये तरुण वयात त्यांनी काही काळ नोकरी केली होती.संत साहित्य,संत चरित्रे ह्यावर त्यांनी विविध दैनिकातून विपुल … Read more

वक्फ मंडळाच्या निवडणुकीसाठी मुतवल्लींची मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुतवल्ली निर्वाचन गणातून निवडणूक घेण्यासाठी राज्यातील मुत्तवल्लींची मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी दिली. वक्फ मंडळावर मुतवल्ली प्रवर्गातील सदस्याची निवडणुकीद्वारे निवड करण्याकरिता वक्फ संस्थांच्या पात्र मुतवल्ली, व्यवस्थापकीय समितीच्या नामनिर्देशित सदस्यांची मतदारयादी अद्ययावत करण्यात येत आहे. … Read more

श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग विकास आराखडा अंतर्गत ‘भक्तनिवास’ इमारतीचे भूमिपूजन संपन्न; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन

बीड : एकविसाव्या शतकात विकासाच्या कावड आपल्याला वाहाव्या लागतील. श्रद्धा, प्रथा, परंपरा प्रत्येकामध्ये असुद्यात पण पुढच्या काळात या क्षेत्राच्या विकासासाठी प्रत्येकाला विकास कार्याच्या कावड आपल्या खांद्यावर घ्याव्या लागतील, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग विकास आराखडा अंतर्गत भक्तनिवास सुसज्ज इमारतीच्या भूमिपूजन … Read more

भाविकांविना वटवृक्ष मंदिरात गुरूपौर्णिमा संपन्न; सलग दुसऱ्या वर्षीही गुरू -शिष्यांच्या भेटीची परंपरा खंडित 

अक्कलकोट:  गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील महतीमुळे श्री गुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थनाच गुरु मानणारे असंख्य स्वामी भक्त असल्याने  येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाच्या दि. २५ मार्च रोजी … Read more