‘देवखेळ’च्या यशात अंकुश चौधरीचा वाढदिवस साजरा : प्राजक्ता माळीची खास पोस्ट

मुंबई : वृत्तसंस्था मराठी चित्रपटसृष्टीतील ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अंकुश चौधरी यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेही खास पोस्ट शेअर करत अंकुशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी सध्या त्यांच्या नवीन … Read more

“बैठकीला जे नव्हते, त्यांना काय माहिती?” : शरद पवारांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सूचक वक्तव्यामुळे नवे परिमाण मिळाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांवर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या … Read more

नीट परीक्षेत सोलापूरच्या डाॅ. चव्हाण दाम्पत्याचे यश

सोलापूर : प्रतिनिधी नीट (सुपर स्पेशालिटी) परीक्षेत सोलापूरच्या डॉ. दिग्विजय-क्रांती चव्हाण या दाम्पत्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. क्रांती यांनी देशात तिसरा तर त्यांचे पती डॉ. दिग्विजय विद्यानंद चव्हाण यांनी देशात ५२ वा क्रमांक मिळवला आहे. पती-पत्नीने नीट परीक्षेत मिळवलेल्या या यशाचे एकमेव उदाहरण आहे. मूळचे सोलापूरचे असलेले डॉ. दिग्विजय चव्हाण यांचे वडील व … Read more

“धूर नव्हता, पण धोका होता” :अजित पवार विमान दुर्घटनेवर अमोल मिटकरींचा संशय

मुंबई : वृत्तसंस्था बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच आता त्यांच्या पक्षातील नेते आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेवर गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत. “धूर नव्हता, पण धोका होता,” असे म्हणत या दुर्घटनेतील शत-प्रतिशत सत्य समोर यावे, अशी स्पष्ट … Read more

आम्ही भाजपसोबत एनडीएमध्ये एकत्र’; सुनील तटकरे यांचे ठाम वक्तव्य !

मुंबई : प्रतिनिधी “आज आम्ही एनडीएमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आहोत. भाजपच्या विचारांशी सुसंगत असलेल्यांनी एनडीएमध्ये यायचे असल्यास आपली भूमिका स्पष्ट करावी,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाची भूमिका ठरवून निवडणूक लढवली आणि यश मिळवले असून, विलीनीकरणाबाबत शरद पवार गटातील … Read more

नागनहळळी आश्रमशाळेच्या प्रयोगाची राष्ट्रीयस्तरावर निवड

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राज्य विज्ञान संस्था, नागपूर व श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन २०२५–२६ दि. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत नागपूर येथे पार पडले.यामध्ये के. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालय, नागनळळी येथील विद्यार्थी फडतरे ओंकार व महेश टेंगळे यांनी स्मार्ट ॲग्रीकल्चर, कॅटल फार्म व बहुउपयोगी … Read more

सोलापूर महापौरपदासाठी भाजपचा अर्ज आज; नावावर सस्पेन्स कायम

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी सोमवारी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून सकाळी १० ते ११.३० वाजेपर्यंत नामनिर्देशनासाठी मुदत आहे. सोलापूर मनपात एकूण १०२ नगरसेवकांपैकी भाजपचे तब्बल ८७ नगरसेवक असल्याने भाजपचाच महापौर बिनविरोध होणार, हे निश्चित आहे. मात्र महापौरपदासाठी नेमके कुणाचे नाव पुढे येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर … Read more

तीन केमिकल पार्क, ग्राम स्वराज उपक्रम जाहीर; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर हल्लाबोल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रमाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या उपक्रमामुळे हातमाग, वस्त्रोद्योग, हस्तकला, विणकर आणि कुटीर उद्योगांना चालना मिळणार असून ग्रामीण भागातील गरीब तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा सरकारचा दावा आहे. भारताकडे क्रीडा-संबंधित उत्पादने विकसित करण्याची मोठी क्षमता असल्याचेही अर्थसंकल्पात नमूद … Read more

पहाटे भूकंपाने काश्मीर खोरे हादरले; सुदैवाने जीवितहानी नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आज पहाटे ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ५:३५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक झालेल्या या भूकंपामुळे अनेक नागरिक घराबाहेर पळाले. भूकंपाचे केंद्र बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टन परिसरात असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्क्यांची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या … Read more

‘विकसित भारताकडे दमदार पाऊल’ : अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : वृत्तसंस्था  केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करत, हा अर्थसंकल्प ‘विकसित भारताकडे एक दमदार पाऊल’ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, या अर्थसंकल्पामुळे देशातील सर्वच क्षेत्रांमध्ये सुधारणा होणार असून, विशेषतः मध्यमवर्ग, शेतकरी, युवक आणि उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. चालू आर्थिक धोरणे आणि गुंतवणूक … Read more