---Advertisement---

भाजपाला आव्हान! सांगलीत संभाजी भिडे गुरुजींचे धारकरी थेट निवडणुकीच्या रिंगणात

By team
On: December 29, 2025 5:41 PM
Follow Us:
---Advertisement---

सांगली वृत्तसंस्था : सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका निवडणूक विशेष चर्चेत आली असून, याठिकाणी संभाजी भिडे गुरुजींच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी भाजपाकडे धारकऱ्यांसाठी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र भाजपकडून केवळ एकाच जागेची ऑफर देण्यात आल्याने धारकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. हिंदुत्व, लव्ह जिहाद, गोरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर सातत्याने सक्रिय असलेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना समाधानकारक प्रतिनिधित्व न मिळाल्याने अखेर त्यांनी स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

आज (२९ डिसेंबर) सांगली महापालिकेसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी राहुल बोळाज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी संभाजी भिडे गुरुजी यांच्या शुभहस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. मोठ्या शक्तिप्रदर्शनासह अर्ज दाखल करत धारकऱ्यांनी आपली ताकद दाखवून दिली.

“पक्षाने आमचा विचार केला नसला, तरी आम्ही अपक्ष म्हणून जनतेसमोर जाणार आहोत. ही लढाई विचारांची आहे,” असे राहुल बोळाज आणि धारकरी सुरेंद्र बोळाज यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सांगली महापालिका निवडणुकीत आता भाजपसमोर नवं आव्हान उभं राहिलं असून, या निवडणुकीत हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!