---Advertisement---

अक्कलकोटला ३० नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

By team
On: November 27, 2025 10:30 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी या तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व सर्व नगरसेवक उमेदवाराच्या प्रचारार्थ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची जाहीर सभा येत्या ३० नोव्हेंबर रोजी अक्कलकोट येथे होणार आहे,अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मंगरुळे प्रशालेजवळ असलेल्या समोरच्या मैदानामध्ये सकाळी साडेदहा वाजता ही जाहीर सभा होणार आहे. अक्कलकोटमध्ये भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी मिलन कल्याणशेट्टी,मैंदर्गीमध्ये अंजली बाजारमठ आणि दुधनीमध्ये अतुल मेळकुंदे हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्याशिवाय या तिन्ही नगरपालिकांमध्ये ६५ उमेदवार हे भाजपकडून आपले नशीब आजमावत आहेत. त्या दृष्टीने भाजपकडून ही मोठी जाहीर सभा होणार आहे.या सभेला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित राहतील अशी माहिती पक्ष कार्यालयाकडून देण्यात आली. भाजप ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे आणि या तिन्ही नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळेल. मागच्या वेळी या ठिकाणी भाजपचे वर्चस्व होते.ते यावेळी देखील कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या सभेच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली असून या तिन्ही नगरपरिषदांच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन मंडल
अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!