---Advertisement---

मुख्यमंत्री शिंदे खोटे बोलतात ; आ.आव्हाडांचा आरोप !

By team
On: December 19, 2023 11:07 AM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यात हिवाळी अधिवेशनात अनेक मंत्र्यांनी विविध घोषणा केल्या आहेत यात मुख्यमंत्री शिंदेंनी देखील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केली असतांना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आ.जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

आ.आव्हाड म्हणाले कि, या घोषणांसाठी त्यांच्याकडे पैसे आहेत का? 1,16,000 कोटी रुपये कुठून आणणार? त्यांच्याकडे काही नाही ते खोटे बोलत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर आव्हाड यांनी जोरदार टीका केली.

गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांची अद्याप पूर्तता केलेली नाही. सभागृहात अशा मोठ मोठ्या घोषणा करण्याची मुख्यमंत्र्यांना सवय आहे. तुम्ही ज्या घोषणा केल्या, त्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्या. मी मुख्यमंत्री असतो तर त्यांनी सांगितल्यापेक्षा जास्त सरकारचे यश सांगितले असते. त्याला काय लागते? ते खोटे बोलत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना कोणतीच मदत केलेली नाही. त्यांच्या सर्व घोषणा फक्त कागदावर आहेत. प्रत्यक्ष जमिनीवर त्यांनी कोणतेच काम केलेले नसल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!