---Advertisement---

मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना : पदाधिकाऱ्यांना विधानसभेला लागा कामाला

By team
On: June 17, 2024 9:34 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे आपले सर्व बालेकिल्ले राखले असून आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या.

शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनाच्या तयारीच्या अनुषंगाने रविवारी शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे; परंतु या निवडणुकीत झालेल्या काही चुका सुधारून आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक सक्षमपणे तयारीला लागले पाहिजे. या लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राईक रेट हा शिवसेना (ठाकरे) सेनेपेक्षा उत्तम होता. त्यांनी २२ जागा लढवून ९ जिंकल्या, तर आपण १५ जागा लढवून ७ जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट हा ४२ टक्के, तर आपला ४८ टक्के एवढा आहे. दुसरीकडे मुंबईत त्यांच्यापेक्षा २ लाख जास्त मते आपल्याला मिळालेली आहेत. छत्रपती संभाजीनगर आपण राखले असून कोकणातही जनतेने महायुतीलाच साथ दिलेली आहे.

शिंदे पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी ‘संविधान बदलणार’ असे खोटे नेरेटिव्ह तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा चुकीच्या नेरेटिव्हची आगामी विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, असा निर्धार व्यक्त करून कामाला लागण्याची सूचना शिंदे यांनी केली. तसेच पंढरपूरच्या आषाढी वारीसहित दहीहंडी, गणपती, दसरा, दिवाळी असे सर्व हिंदूंचे सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे करावेत, वारीला निघणाऱ्या पालख्यांचे पक्षाच्या वतीने जागोजागी स्वागत करावे तसेच गावागावात वाडी-वस्तीवर शिवसेनेचे बोर्ड लावावेत, शाखा सुरू कराव्यात, अशा सूचनाही शिंदे यांनी केल्या

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!