मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई येथे आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट Mumbai Tech Week पार पडत असून त्यामुळे मुंबई ही TECH ची राजधानी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. इतकेच नाही तर आता राज्य सरकारच्या 500 सर्व्हिसेस व्हॉट्सॲप गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. त्यासाठी राज्य सरकारने मेटा या कंपनीसोबत करार केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, Mumbai Tech इव्हेंट मध्ये आम्ही मेटा सोबत एक करार केला आहे. त्यानुसार आता राज्यातील अनेक सेवा या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मिळू शकतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबई मेट्रोचे तिकीट जेव्हा आम्ही व्हॉट्सॲपवर आणले त्यावेळी 50% पेक्षा जास्त तिकीट व्हॉट्सॲपवर निघाली, हे आमच्या लक्ष्यात आले. त्यामुळे आता राज्यातील सर्व सेवा आता व्हॉट्सअप च्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील. त्यामुळेच व्हॉट्सॲप गव्हर्नन्सच्या माध्यमातून 500 सर्व्हिसेस नागरिकांना मिळतील, असा दावा देखील त्यांनी केला.
या संदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता गावातील शेवटचा माणूसही व्हॉट्सअपचा वापरतो आहे. त्यामुळे त्याला कुठेही ऑनलाइन जाण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअपच्या माध्यमातून 500 सरकारी सेवा तो प्राप्त करू शकतो. हा अत्यंत महत्त्वाचा करार आता राज्य सरकारने केला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
एनपीसीआय यांनी युपीआय बनवले होते. त्याच एनपीसीआय कंपनीचे ग्लोबल हेडक्वार्टर आता मुंबईमध्ये तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आज आम्ही त्यांना जागेची कागदपत्रे हस्तांतरित केली आहेत. मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी घोषणा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एनपीसीआयचे ग्लोबल ऑफिस हे मुंबईमध्ये येत आहे. यांनीच युपीआय तयार केले असून जगभरातील 80 देशांनी त्या युपीआयला मान्यता दिली आहे. अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे.