---Advertisement---

मुख्यमंत्र्यांचा घणाघात : म्हणून उबाठाचे उमेदवार जिंकले

By team
On: June 20, 2024 8:54 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात १२ जागांवर जिंकलेली ‘उबाठा जीत का जश्न’ साजरी करत आहे. मात्र उबाठाचे उमेदवार काँग्रेसच्या व्होट बँकेमुळे जिंकले आहेत. काँग्रेसच्या मतदारांनी त्यांना तारले आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. तसेच मुस्लिम मतांमुळेच उबाठाचे उमेदवार जिंकल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त वरळी येथील एनएससीआय डोम येथे शिंदेसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे आम्ही जिंकलो असे म्हणत आहेत. मात्र शिवसेनेचा मतदार त्यांच्याबरोबर राहिला आहे का? मुंबईत त्यांच्यापेक्षा सव्वादोन लाख अधिक मते आम्हाला मिळाली. शिवसेनेचा मतदार दुसरीकडे गेला नाही. तो आपल्याकडेच आला.

वरळीत उद्धवसेनेचे मताधिक्य घटले. त्यावरून शिंदे यांनी उद्धवसेनेला लक्ष्य केले. काहींनी मतांसाठी फतवे काढले. आता त्यांना ओवेसीपेक्षा उबाठा जवळची वाटत आहे. वरळीत त्यांना केवळ ६ हजारांचे मताधिक्य मिळाले. विधानसभेला एवढीही मते मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!