---Advertisement---

कौतुकास्पद : भारतातील सर्वात लहान जलतरणपटू ठरून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव !

By team
On: December 6, 2025 10:05 AM
Follow Us:
---Advertisement---

रत्नागिरी : वृत्तसंस्था

अवघी नऊ महिन्यांची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात करणार्‍या रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील वेदा परेश सरफरे हिचा प्रवास आता फक्त 1 वर्ष 9 महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत पोहचला आहे. 100 मीटरचे अंतर 10 मिनिटे आणि 8 सेंकदात पूर्ण करत वेदा भारतातील सर्वात लहान जलतरणपटू बनली आहे.

वेदाचा मोठा भाऊ रूद्र शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो. तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे. रूद्रला घेऊन त्याची आई पायल सरफरे शासकीय जलतरण तलावावर येत होती. तिच्या कंबरेवर बसून वेदा हे जलतरण तलावातील पोहणं पहायची. एक दिवस प्रशिक्षक महेश मिलके यांनी वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हात-पाय मारून तिने पाण्याशी दोस्तीच केली. हळूहळू ती पोहायला लागली. जलतरण तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून वाढला. वेदाला गौरी मिलके प्रशिक्षण देत आहेत.

वेदा पोटात असताना तिची आई पायल रूद्रला जलतरण स्पर्धांना घेऊन जायची. कारवांचीवाडी येथून ती दररोज जलतरणच्या सरावासाठी जलतरण तलावावर घेऊन यायची. ती लहान असतानाही तिला जलतरण तलावावर तिची आई घेऊन यायची, असे वेदाचे वडील परेश यांनी सांगितले. इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आल्यानंतर आता वेदा आशिया बुक आणि गिनीज बुकात नाव नोंदवण्यासाठी सज्ज झाली असल्याचे वेदाचे वडील परेश सरफरे यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!