ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कॉंग्रेस नेते पटोले सरकारवर बरसले : आता सरकारवरच तीर्थदर्शनाला जाण्याची वेळ…

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला असून अनेक योजनेच्या देखील घोषणा झाल्या आहे. यावर आता विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना घोषित केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या योजनेवर निशाणा साधताना आता सरकारवरच तीर्थदर्शनाला जाण्याची वेळ आल्याची खोचक टीका केली. आता या सरकारवर तीर्थदर्शनाला जाण्याची वेळ आली आहे. कारण, महाराष्ट्राच्या जनतेने त्याला त्याची जागा दाखवली आहे, असे ते म्हणाले.

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण व नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असे ते म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी त्यांच्यावर टीका केली.

आता या सरकारवर तीर्थदर्शनाला जाण्याची वेळ आली आहे. कारण, महाराष्ट्रातील जनतेने या सरकारला त्याची जागा दाखवली आहे. काल अर्थसंकल्प सादर झाला, पण त्यातील घोषणा पूर्ण करण्यासाठी पैसा कुठून आणणार? याचे कोणतेही उत्तर सरकारकडे नाही. घोषणांची अंमलबजावणी शून्य टक्के आहे. आता सरकार खोटे बोलून केवळ नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे, असे नाना पटोले म्हणाले. वारकरी पंथाची लोकं येऊन गेली. सरकार वारकरी प्रथेला सुविधा देण्याऐवजी ही प्रथा तोडता कशी येईल याचा प्रयत्न करत आहे. निरर्थक गवगवा करत आहे. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. मुख्यमंत्री तीर्थयात्रा म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाची कढी असे झाले आहे. महायुती सरकारचे वास्तविक दर्शन आम्ही मांडणार आहोत, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!