---Advertisement---

मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाला बसणार मोठा धक्का !

By team
On: July 25, 2025 5:03 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक विरोधी आमदार व नेते भाजप पक्षात येत असतांना आता मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्याल हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. गोरंट्याल हे भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला मोठा झटका मानला जाईल.

विधानसभा निवडणुकीमध्ये कैलास गोरंट्याल यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर गोरंट्याल यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केले असल्याची तक्रार पक्षाकडे केली होती. मात्र त्यांना पक्ष श्रेष्ठींकडून अपेक्षित अशी साथ मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी या आधीच थेट नाराजी देखील व्यक्त केली होती. तेव्हापासूनच ते भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता गोरंट्याल यांनी एक वृत्त वाहिनीशी बोलताना या संबंधीचे वक्तव्य केल्याने, पुन्हा एकदा ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. अशातच जालना नगरपालिकेवर काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल यांचे वर्चस्व होते. ही निवडणूक समोर आलेली असताना कैलास गोरंट्याल हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याने भाजपचा पारडे आणखीच जड होणार आहे. त्यात शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांना शह देण्यासाठी देखील गोरंट्याल यांचा उपयोग भाजपला होणार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची देखील काही दिवसांपूर्वीच गोरंट्याल यांनी भेट घेतली होती. त्या बैठकीत त्यांच्या भाजप प्रवेशाचे निश्चित झाले असल्याची माहिती समोर आली होती. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे यांच्या देखील ते संपर्कात आहेत. त्यांच्या माध्यमातून गोरंट्याल हे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!