ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कॉंग्रेसचा सरकारला इशारा : महायुती ‘गजनी सिंड्रोम’ने ग्रस्त !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात ५ ऑक्टोबर रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख आश्वासने जाहीर केली. एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेत सांगितले होते की, व्हिजन महाराष्ट्र 2029 च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत पूर्ण केली जातील.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे निवडणुकीतील आश्वासन पूर्ण न करण्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसने महायुती सरकारवर केला आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युती ‘गजनी सिंड्रोम’ने ग्रस्त असल्याचे बुधवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे निवडणूक आश्वासन ते विसरले आहेत.

ते म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कर्जमाफी आणि महिलांना पैसे देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. जनतेचे लक्ष खऱ्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करून औरंगजेबाच्या कबर सारख्या मुद्द्यांकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता काँग्रेसने महायुती सरकारला इशारा दिला आहे की, जर सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस पावले उचलली नाहीत तर शेतकरी आंदोलन केले जाईल. सपकाळ म्हणाले की, सरकारने पेरणीच्या हंगामापूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे किंवा केंद्राकडून विशेष मदत पॅकेज घ्यावे.

यापूर्वी 29 मार्च रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत कर्जमाफी नाकारली होती. त्यांनी म्हटले होते की, राज्याची आर्थिक परिस्थिती हे मान्य करत नाही आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जाचे हप्ते वेळेवर फेडले पाहिजेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरएसएस मुख्यालयाच्या अलिकडच्या दौऱ्या बद्दलही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले. सपकाळ म्हणाले की, मोदीजींनी संघाचा आश्रय घेतला होता कारण आता त्यांचे पंतप्रधानपद धोक्यात आहे. यावरून त्याची पकड कमकुवत होत असल्याचे दिसून येते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group