---Advertisement---

महाविकास आघाडीत वाद : ममतांचा ‘एकला चलो’चा नारा

By team
On: January 24, 2024 3:40 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून इंडिया आघाडीत जागा वाटपावरुन बोलणी सुरु होती. पण यात बोलणी कमी आणि वादविवाद होता, असं समोर येतंय. लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला आहे.

ममता बॅनर्जी यांनी टीएमसी लोकसभा निवडणूक एकट्या लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. ममतांच्या या घोषणेने इंडिया आघाडीसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. आज त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. त्यांनी पश्चिम बंगलामध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.

टीएमसी आणि काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून जागा वाटपावरुन वादविवाद सुरु होते. या दोन्ही पक्षांमध्ये त्याबाबत एकमत झालं नाही. म्हणून TMC ने एकट्याने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. लोकसभेच्या पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत. काँग्रेससोबत माझी कुठलीही चर्चा झालेली, नाही, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलंय. टीएमसीने काँग्रेसला दोन जागा देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!