---Advertisement---

कोविडचे संकट वाढलं : राज्यात आढळले आणखी ८ रुग्ण !

By team
On: May 20, 2025 10:02 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात पुन्हा एकदा कोविडचे संकट वाढले असल्याचे दिसून आले आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयात काल दोन कोव्हिड सदृश्य असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अजून आठ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे.

या रुग्णांना वेगवेगळ्या व्याधींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरीही, त्यांचा रिपोर्ट कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे. सर्व नागरिकांनी, मुंबईकरांनी सावधगिरी पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केले जात आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही रुग्ण सिंधुदुर्ग आणि डोंबिवली येथील होते. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या ८ रुग्णांना सेव्हन हिल रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, सिंगापूर आणि चीनमध्ये वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे भारतातील विशेषतः मुंबईसारख्या महानगरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मात्र या नवीन रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. केईएम रुग्णालयात मृत्यू झालेल्या दोन्ही रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून, कोविड प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर आयसोलेटेड पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!