---Advertisement---

संजय राऊत यांना मानहाणीची नोटीस ; मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा !

By team
On: July 12, 2025 5:52 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना मानहाणीची नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. गत काही दिवसांपासून संजय राऊत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी माझी माफी मागितली नाही, तर मी त्यांना मानहाणीची नोटीस बजावेल. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करेन, असे ते म्हणालेत. संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांच्याविषयी काय – काय बोलले होते, त्याचा व्हिडिओ पाहिला, तर आपल्याला त्यांची लायकी कळेल, असेही ते यावेळी म्हणाले.

मंत्री संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, संजय राऊत यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. ते राज्यघटना मानत नाहीत. ते पुन्हा सांगतील अशा अनेक नोटीस आम्ही खिशात घेऊन फिरतो. परंतु कायद्याच्या चौकटीत बसून मी आज नोटीस पाठवणार आहे.याचे उत्तर दिले नाही तर फौजदारी गुन्हा देखील दाखल करेल.

संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत रोज सकाळी लोकांच्या शिव्या खातात.म्हणून त्यांना मान अपमान काही कळत नाही.कोणत्या गोष्टीवर बोलावे याचे त्यांना भान नाही. त्यांचे जे विद्वान सहकारी आहे एक महिन्याचे विद्वान असेच आरोप करत राहणार. हे सगळे दलालांची एक गँग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे.याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहे, पण खालच्या राजकारणाकडे मला जायचे नाही. परंतु आता मला असा वाटायला लागले आहे की आता त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे, असे म्हणत त्यांनी अंबादास दानवेंवर टीका केला आहे. हे सर्व रुदाली पक्षाचे रडके लोक आहेत. अभ्यास न करता बोलणाऱ्याच्या बुद्धीचा कीव येते.

संजय शिरसाट म्हणाले की, कोणी कुठे कुठे सरकारी बंगल्यात पार्ट्या केल्या आहेत त्याचे व्हिडिओ मला पुढे आणावे लागतील. पुणे, मुंबई असे सर्व प्रकार जेव्हा मी बाहेर काढेल त्यांना पळता भोई थोडी होईल. पण मला या नीच पातळीवर जाण्याची आज तरी इच्छा नाही. जर माझ्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न केला तर मलाही तसे उत्तर द्यावे लागेल.

संजय शिरसाट म्हणाले की, सुसंस्कृत असलेले तुम्ही अशी नीच पातळीवर गाठली का? असे राजकारण महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिले नाही. अशा व्हिडिओतून आमची बदनामी होते असे तुम्हाला वाटते. मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे हे यातून दिसून येते. जयंत पाटील हे गेली अनेक दिवस मनातून पक्षासाठी काम करताना दिसून येत नव्हते. त्यांनी मागेच सांगितले होते की मी राजीनामा देणार. त्यातून त्यांनी आज राजीनामा दिला असेल. ते आमच्यासोबत येतील याचा निर्णय कधी घेता त्यांना विचारा.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!