अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दि.२७ : हाजी इमामोददीन पटेल गुरुजी प्रतिष्ठान तर्फे अक्कलकोट येथील अँग्लो उर्दू स्कूलच्या इयत्ता नववी व दहावी वर्गातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच्याचे मोफत वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नागनळळी आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल व प्रतिष्ठानचे सचिव तथा प्राचार्य इस्माईल मुजावर, अँग्लो उर्दू स्कूलचे मुख्याध्यापक सैफोद्दीन काझी, रुद्राक्ष वैरागकर, अल्ताफ पटेल आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार अँग्लो उर्दू प्रशालेच्यावतीने करण्यात आला.नागनळळी आश्रम शाळेचे सहशिक्षक वैरागकर यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या पाठ्यपुस्तकाचे वाचन करून जीवनात यशस्वी व्हावे,असे मनोगतातून व्यक्त केले.प्रतिष्ठानचे सचिव मुजावर यांनी उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी नागनळळी आश्रम शाळेमध्ये माफक दरात प्रवेश दिला जाईल व पुढील शिक्षणाची सोय केली जाईल,असे आश्वासन दिले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष पटेल, सचिव मुजावर यांच्या हस्ते गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तकाचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास नागनळळी आश्रम शाळेचे शिक्षक मोहन गुरव,शंभुलिंग बशेट्टी व उर्दू शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाली बागवान यांनी तर आभार मुख्याध्यापक
काझी यांनी मानले.